कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा?

पंतप्रधान मोदी खासदारकीची शपथ घेताना राहुल गांधींनी का दाखवलं संविधान?

narendra modi takes oath 1

देशात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं असून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून (२४ जून) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत खासदारांना खासदाकीची शपथ दिली जात आहे. या सोहळ्याची चर्चा देशभरात होत आहे. दरम्यान, सभागृहात आणि सभागृहाबाहेर अनेक घटना घडल्याचं पाहायला मिळाली. अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ससदेबाहेर हातात संविधानाच्या प्रती घेऊन घोषणाबाजी केली. तसेच आम्ही देशाची लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवू असा विश्वास व्यक्त केला. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा लोकशाही आणि संविधानाला धोका असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.


दरम्यान, विरोधी पक्षांमधील सर्व खासदार संविधानाच्या प्रती घेऊन संसदेत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीची शपथ घेतली तेव्हा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींना संविधानाची प्रत दाखवली. खासदारांचा शपथविधी सुरू झाल्यानंतर लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनी नरेंद्र मोदींना शपथ घेण्यासाठी पाचारण केलं. मोदी त्यांच्या बाकावरून उठून मंचाकडे जात असताना आणि शपथ घेत असताना राहुल गांधी यांनी हात उंचावून त्यांना संविधानाची प्रत दाखवली. राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाची संविधानाची मिनी कॉपी होती. मोदींची शपथ पूर्ण होईपर्यंत विरोधी पक्षांचे खासदारही त्यांना संविधानाची प्रत दाखवत होते.

तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह ‘इंडिया’च्या खासदारांनी संसदेबाहेर “आम्ही संविधानाचं रक्षण करणार” अशा घोषणा दिल्या. यावेळी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघे भारताच्या संविधानावर आक्रमण करत आहेत. आम्ही ते खपवून घेणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं रक्षण करू.

भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांनी मोदींना खासदारकीची शपथ दिली. त्यानंतर भाजपा खासदार राधा मोहन सिंह यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनेलमधील सदस्य म्हणून शपथ घेतली. भाजपा खासदार फग्गन सिंह कुलस्ते आणि राधा मोहन सिंह पुढील दोन दिवस सभागृहाच्या कामकाजात हंगामी अध्यक्षांची मदत करतील.

दरम्यान, सभागृहात जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला म्हणाले, सर्व विजयी खासदारांचं मी अभिनंदन करतो. मला आशा आहे की ही संसद लोकशाही टिकवेल. या निवडणुकीत जो तिरस्कार आणि घृणा समाजात पसरवली गेली होती ती नष्ट होईल, अशी मी अपेक्षा करतो. देशातलं सरकार कुबड्यांर आहे, तर त्यांच्यासमोर एक मजबूत विरोधी पक्ष उभा आहे.



रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट