कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षणावरुनराज्यातील वातावरण तापलेय. मनोज जरांगे  आणि छगन भुजबळ  यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता मनोज जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांचं छगन भुजबळांना बळ असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. आज छत्रपती संभाजीनगरऔरंगाबाद येथे भाषणादरम्यान जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला.

छगन भुजबळ यांना बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, यांचं एकूण तुम्ही आमच्या लोकांना अटक केली. यांचं ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. भुजबळांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं, तरी केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र खाल्ला आहे. फडणवीस साहेब भुजबळांना बळ द्यायला लागले असं दिसत आहे.  भुजबळ बोलले, त्यामुळेच गावा गावात जातीय तणाव निर्माण होत आहे, असे मनोज जरांगे म्हणालेत. 

भाजपसाठी हे चांगलं नाही - 

आम्ही शांततेच आव्हान करतो आणि तुम्ही लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल. हे मराठ्यांच्या किती हिताचे आहेत, हे मराठयांना माहीत आहे. सगळं खाल्लं. फडणवीस साहेब याला बळ देत असल्याने भाजपसाठी हा चांगला संदेश नाही. आरक्षण ही केंद्र आणि राज्याची सुविधा आहे. यांचं ऐकू नये. हा माणूस प्युअर जातीयवादी आहे. हा लहान जातींना सुद्धा आरक्षण खाऊ देत नाही, असे जरांगे म्हणाले.

नाराजी ओढून घेऊ नका -

राज्य  सरकारने आमच्याकडून वेळ घेतली आहे. भुजबळ फडणवीस यांचा कार्यक्रम करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना कुणी ओबीसी नेता मानत नाही. भुजबळ तुमचा गेम करेल, तुम्ही त्याला सूट देऊ नका. नाराजी ओढून घेऊ नका, असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला.

कुणाचंही ऐकून हे मराठ्यावर अन्याय करणार पण जनता हुशार आहे. म्हणून 17 तारखेला आम्ही बैठक बोलवली आहे. तु्म्हाला गादीवर तुडवायला वेळ लागणार नाही. तरिही आम्ही 24 तारखेपर्यत विश्वास ठेवू, असे जरांगे म्हणाले. 

भुजबळांना उत्तर - 

मला गोळी मारण्याची शक्यता आहे, असे भुजबळ म्हणाले होते. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, यांचं डोकं फिरलं आहे. तु्म्ही आधी नीट बोला. मराठ्याबद्दल राग, विषारी भाषा बोलू नका. आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही, पण तुला आता सुट्टी नाही. हे विनाकारण धमकावत आहेत. धनगर समाजाबद्दल आरक्षण देण्याला तुम्हाला रोग आला का?  तुम्हाला कुणी गुलालही लावणार नाही आणि तूम्ही म्हणता गोळी मारणार, असे जरांगे म्हणाले. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट