Breaking News
मराठा आरक्षणावरुनराज्यातील वातावरण तापलेय. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता मनोज जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांचं छगन भुजबळांना बळ असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. आज छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे भाषणादरम्यान जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला.
छगन भुजबळ यांना बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, यांचं एकूण तुम्ही आमच्या लोकांना अटक केली. यांचं ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. भुजबळांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं, तरी केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र खाल्ला आहे. फडणवीस साहेब भुजबळांना बळ द्यायला लागले असं दिसत आहे. भुजबळ बोलले, त्यामुळेच गावा गावात जातीय तणाव निर्माण होत आहे, असे मनोज जरांगे म्हणालेत.
भाजपसाठी हे चांगलं नाही -
आम्ही शांततेच आव्हान करतो आणि तुम्ही लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल. हे मराठ्यांच्या किती हिताचे आहेत, हे मराठयांना माहीत आहे. सगळं खाल्लं. फडणवीस साहेब याला बळ देत असल्याने भाजपसाठी हा चांगला संदेश नाही. आरक्षण ही केंद्र आणि राज्याची सुविधा आहे. यांचं ऐकू नये. हा माणूस प्युअर जातीयवादी आहे. हा लहान जातींना सुद्धा आरक्षण खाऊ देत नाही, असे जरांगे म्हणाले.
नाराजी ओढून घेऊ नका -
राज्य सरकारने आमच्याकडून वेळ घेतली आहे. भुजबळ फडणवीस यांचा कार्यक्रम करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना कुणी ओबीसी नेता मानत नाही. भुजबळ तुमचा गेम करेल, तुम्ही त्याला सूट देऊ नका. नाराजी ओढून घेऊ नका, असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला.
कुणाचंही ऐकून हे मराठ्यावर अन्याय करणार पण जनता हुशार आहे. म्हणून 17 तारखेला आम्ही बैठक बोलवली आहे. तु्म्हाला गादीवर तुडवायला वेळ लागणार नाही. तरिही आम्ही 24 तारखेपर्यत विश्वास ठेवू, असे जरांगे म्हणाले.
भुजबळांना उत्तर -
मला गोळी मारण्याची शक्यता आहे, असे भुजबळ म्हणाले होते. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, यांचं डोकं फिरलं आहे. तु्म्ही आधी नीट बोला. मराठ्याबद्दल राग, विषारी भाषा बोलू नका. आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही, पण तुला आता सुट्टी नाही. हे विनाकारण धमकावत आहेत. धनगर समाजाबद्दल आरक्षण देण्याला तुम्हाला रोग आला का? तुम्हाला कुणी गुलालही लावणार नाही आणि तूम्ही म्हणता गोळी मारणार, असे जरांगे म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times