-360 एक्सप्लोररच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची उल्लेखनीय कामगिरीची दखल
सोलापूर: भारताचा एव्हरेस्टवीर विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे याची निवड फॉक्स स्टोरी मॅगझीन मार्फत देशभरातील 40 वयोगटाच्या आतील टॉप 100 लोकांमध्ये झाली आहे. आनंदने जगभरातील 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरे सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विक्रम केले आहेत. याशिवाय 360 एक्सप्लोरर मार्फत साहसी मोहिमा आयोजित करणारी कंपनी काढून यामार्फत कित्येक मोहिमा केलेल्या आहेत. सोलापुरसारख्या अगदी छोट्या शहरात सुरवात करून सिलिकॉन व्हॅलीतील जगातील सर्वात मोठ्या एक्सेलरेशन प्रोग्राममध्ये आनंद व 360 एक्सप्लोररची 2022 मध्ये निवड झाली होती. या सर्व अफलातून कामगिरीची दखल घेऊन फॉक्स स्टोरी मॅगझीनमार्फत भारतातील 40 वयोगटातील टॉपच्या 100 युवकांमध्ये झाली आहे.
"100 अंडर 40" अश्या सर्व्हेमध्ये 40 पेक्षा कमी वयोगटातील देशातील 100 टॉप लोकांची यादी फॉक्स स्टोरी मॅगझीनने दरवर्षी प्रसिद्ध करत असते. हजारो युवकांचा यामध्ये सर्व्हे करून ही निवड केली जाते.
आनंद बनसोडेची या यादीत निवड होणे ही सोलापूरच्या दृष्टीने खूपच अभिमानाची बाब आहे.
" फॉक्स स्टोरीच्या '100 अंडर 40' मध्ये निवड होणे ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. गिर्यारोहन, लेखन किंवा आता उद्योजक क्षेत्रात कामगिरी करत असताना फॉक्स स्टोरीने अशी दखल घेणे खूपच आनंददायी आहे".
-आनंद बनसोडे (उद्योजक, गिर्यारोहक, लेखक)
आनंद बनसोडेची आतापर्यंत कामगिरी-
1) 19 मे 2012 साली जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करून सोलापूरचा पहिला एव्हरेस्टवीर बनण्याचा मान.
2) 2013 मध्ये पहिले पुस्तक प्रकाशित. तसेच आतापर्यंत 5 पुस्तके प्रकाशित व लेखनासाठी "झी युवा साहित्य सन्मान" पुरस्कार.
3)2014- आफ्रिका, यूरोप व ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखरे सर करून त्यावर गिटारवर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम
4) 2015 मध्ये अलास्का येथे मोहिमेवर असताना वडिलांचे निधन.
5) 2015 मणक्याच्या आजाराने अंथरुणाला खिळल्यानंतर पुन्हा कधीही चालू शकणार नाही अशी शक्यता तरीही आजारपणाला मात.
6) 2016 मध्ये भारताची संविधानाची प्रस्तावना वाचून लग्न.
7) 2017 साली '360 एक्सप्लोरर' या कंपनीची स्थापना व त्यामार्फत जगभरातील लोकांच्या साहसी मोहिमा आयोजित.
8)2017 मध्ये युनायटेड नेशन्सच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात 110 देशांतील प्रतिनिधीसमोर भाषण.
9) 2022 मध्ये 360 एक्सप्लोररची अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमधील जगातील सर्वात मोठ्या एक्सेलरेशन प्रोग्राममध्ये मध्ये निवड.
10)2023- युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखरे दोन वेळा सर करून ही शिखरे सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन बनण्याचा मान.
रिपोर्टर
Suhas Kamble
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Suhas Kamble