Breaking News
“आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं धक्कादायक विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरात गदारोळ निर्माण झाला. छगन भुजबळ यांनीही मनोज जरांगेंचा खरपूस समाचार घेतला होता. मनोज जरांगे पाटलांनी आता यावरून आपले शब्द मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
“माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता. माझा उद्देश वेगळा होता. त्याला जाणीवपूर्वक जातीय रंग दिला गेला. त्या शब्दाचा गैरसमज झाला. काही लोकांनी त्या शब्दाचा वेगळा अर्थ जोडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता. कारण मी कधीही जीवनात जातीयवाद केला नाही. माझ्या गोदापट्ट्यातील लोकांनाही माहितेय की मी कधीही जातीवाद केला नाही. मराठा आरक्षणावरून आमचं ध्येय, मन हटणार नाही. आम्ही आमच्या ध्येयावरून विचलीत होणार नाही. परंतु, काही लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही, आरक्षणात बसत असूनही आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं होतं.
छगन भुजबळ म्हणाले, “जरांगे-पाटलांचं मत योग्य आहे. माझी लायकी काय? मी तर माळी आहे. माझ्या हाताखाली काम करणारा मराठा माझ्यापेक्षा जातीनं मोठा आहे. दलित पोलीस अधीक्षक होतो. त्याच्या हाताखाली उपअधीक्षक मराठा असतो. अधीक्षकांनी काम करूच नये. कारण, त्यांची लायकी नाही. हे नवीन चातुर्वर्ण तयार झालं आहे.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times