Breaking News
मुंबई- मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. अशोक प्रधान यांच्यावर काहींनी घरात घुसून हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. हे हल्लेखोर निलंबित प्राध्यापक असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात डॉ. प्रधान हे गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी शैक्षणिक संस्थेतील या हल्लेखोर प्राध्यापकांचे गैरवर्तन आणि कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे त्यांना कामावरून निलंबित केले होते. याच वादातून या कुलगुरुंना मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोडवरील कुलगुरुंच्या घरी ही घटना घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात विविध कलामानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. निलंबित प्राध्यापक संजय जाधव (वय 50), त्याचा साथीदार संदेश जाधव (वय 32), एक अल्पवयीन आणि एका महिलेसह दोन अनोळखी पुरुष अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. अशोक प्रधान हे मुंबई विद्यापीठातून निवृत्तीनंतर दुसऱ्या शिक्षण समितीचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. निलंबणामुळे प्राध्यापकाचे वेतनही बंद झाले होते ज्याचा राग त्याच्या डोक्यात होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times