Breaking News
जालना : धनगर समाजाच्या मोर्चाला आज (दि.२१) हिंसक वळण लागले. आंदोलकांनी दगडफेक करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या. अधिकारी निवेन स्वीकारण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
धनगर समाजासाठी अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. प्रशासकीय अधिकारी लवकर निवेदन स्वीकारण्यास न आल्यामुळे संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दगडफेक केली. त्यात शासकीय वाहने व दुचाकीचे नुकसान झाले. गांधी चमन येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. यात हातात पिवळे रुमाल आणि झेंडे घेत कार्यकर्ते सहभागी झाले होते. २०१४ ला भाजप सरकार सत्तेवर येत असताना त्यांनी धगनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मोर्चा काढण्यात आला होता. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट केले नाही, तर सरकारला सत्तेवरून खाली खेचू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times