Breaking News
जालना- सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गेले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास हरकत नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ देत उपोषण तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. पण, उर्वरित महाराष्ट्राचं काय? आपल्या भाऊबंधूंना देखील आरक्षण मिळायला पाहिजे. सगळ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे. त्यामुळे सरकार आणखी थोडा वेळ मागत असेल तर आपण त्यांना तो देऊ. सरकार मराठा आरक्षण द्यायला तयार झालं आहे. वेळ घ्या, पण सरसकट आरक्षण द्या, असं जरांगे पाटील म्हणाले.
आणखी थोडा वेळ दिल्याने काही फरत पडत नाही. मराठा समुदायाचा अपमान होऊ देणार नाही. जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ देण्याची तयारी केली होती. पण, सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ मागितला. यावेळी जरांगे पाटलांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times