Breaking News
क्विंटन डि-कॉक आणि वॅन डॅर ड्यूसेनची शतकी खेळी आणि केशव महाराजच्या फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर तब्बल १९० धावांनी विजय मिळवला. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, द. आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात न्यूझीलंडला अपयश आले. मात्र विजयामुळे भारताला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका संघ या विजयामुळे पहिल्या स्थानावर पोहचला आहे, तर भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 38 धावांवर पहिला धक्का दिला. कर्णधार टेंबा बावुमा फक्त 24 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि हेनरिक क्लासेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागिदारी रचली. ड्युसेनने 118 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 133 धावांची खेळी केली, तर डी कॉकने 116 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 114 धावांची खेळी खेळली. याशिवाय डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 धावांचे योगदान दिले. हेन्रिक क्लासेन 7 चेंडूत 15 धावा आणि एडन मार्कराम एका चेंडूवर 6 धावा करून नाबाद राहिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने 50 षटकांत 4 विकेट गमावताना 357 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 35.3 षटकांत सर्वबाद 167 धावांवर आटोपला. त्यांचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. ग्लेन फिलिप्सने 50 चेंडूत 60 धावा केल्या. याशिवाय विल यंगने 33 आणि डॅरिल मिशेलने 24 धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्र आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी नऊ धावा, मिचेल सँटनर आणि टीम साऊदीने प्रत्येकी सात धावा, टॉम लॅथमने चार आणि डेव्हन कॉनवेने दोन धावा केल्या. जेम्स नीशम शून्यावर बाद झाला. मॅट हेन्री खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर, मार्को जॅनसेन याने 3 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय गेराल्ड कोएत्झीने 2 आणि कागिसो रबाडाला 1 विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव करत विश्वचषकात सहाव्या विजयाची नोंद केली. या विजयासह आफ्रिका संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्यांचे 12 गुण झाले आहेत. मात्र दुसरीकडे न्यूझीलंडला एक स्थान गमवावे लागले. न्यूझीलंड संघ तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. सात सामन्यांमध्ये त्यांचा हा तिसरा पराभव आहे. त्याच्या खात्यात सध्या आठ गुण आहेत. विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंड संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. मात्र त्यांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. न्यूझीलंड संघ 4 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि 9 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाला भारत (5 नोव्हेंबर) आणि अफगाणिस्तान (10 नोव्हेंबर) विरुद्ध शेवटचे दोन सामने खेळायचे आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times