ब्राह्मोस हे भारतातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.
रशियाच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती
आता लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांकडून वापरली जात आहे.
सुरुवातीला ब्रह्मोस जमिनीवरून हवेत हल्ला करण्यासाठी विकसित करण्यात आले.
यशस्वी चाचणीनंतर लडाखमधील LAC वर ब्रह्मोस तैनात करण्यात आले आहे.
त्यानंतर भारतीय हवाई दलाने सुखोई-३० एमकेआय विमानाच्या मदतीने ब्रह्मोस
लॉन्च केले.त्यानंतर आता भारतीय नौदलाकडून बंगालच्या उपसागरात ब्राह्मोस
क्षेपणास्त्राची आज (दि.१) यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता ब्राह्मोसचा
लष्कराच्या तीन रेजिमेंटमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे आता जमीन, पाणी
आणि आकाश या तिन्ही ठिकाणी शत्रू पळू शकत नाही. तसेच ब्रह्मोस-२ वर काम
सुरू आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (BrahMos Missile News) ब्राह्मोस
हे भारताच्या स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा वेग हा
ध्वनीच्या वेगाहून अधिक आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा
जमिनीवरून डागण्यात येऊ शकते.
रिपोर्टर
The Global Times
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times