कमल नागरी पतसंस्थाराज्य कॅरम - प्रशांत आणि अंबिका विजेते
कमळ नागरी सहकारी पतसंस्था आयोजित पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात मुंबईच्या माजी विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने मुंबई उपनगरच्या विद्दमान विश्व् विजेत्या संदीप दिवेवर २५-४, २५-७ अशी सहज एकतर्फी मात करून विजेतेपद मिळविले. मागील तीन स्पर्धांमध्ये संदीपने प्रशांतला हरविले होते. मात्र या एकतर्फी विजयाने प्रशांतने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. विजेत्या प्रशांतला रोख रुपये २५ हजार व कमळ नागरी पतसंस्था चषक देण्यात आला.
या गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या योगेश परदेशीने पुण्याच्याच सागर वाघमारेवर २५-०, २४-१३ असा सहज विजय मिळवून तिसरे पारितोषिक पटकाविले
तर महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या अंबिका हरिथने ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २५-७, ३-२५ व २५-५ असा विजय मिळवून या गटाचे विजेतेपद पटकाविले. अंबिकाने ८ हजारची कमाई केली. शिवाय तिलाही कमळ नागरी पतसंस्था चषक देऊन गौरविण्यात आले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या महिलांच्या लढतीत मुंबईच्या काजल कुमारीने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २२-१३, २५-० असे सहज पराभूत करून तिसरा क्रमांक प्राप्त केला. विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष व रायगड डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे आयोजक कमळ नागरी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष सतिश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानीत करण्यात आले. या प्रसंगी रायगड डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव दीपक साळवी, खजिनदार वैभव पेठे, अभिजित तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Global Times
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times