मराठा आरक्षणासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे यावेळी उपस्थित होते. दोन्ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष, प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. या सर्वपक्षीय बैठकीत खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.
''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.''
रिपोर्टर
The Global Times
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times