कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : पदकतालिकेत महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम; पिंच्याक सिल्याट, जलतरण, वेटलिफ्टिंगमध्ये पदके

गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रविवारी पिंच्याक सिल्याट, जलतरण आणि वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांनी महाराष्ट्राची यशोपताका फडकवत ठेवली. पदकतालिकेत अग्रस्थानी कायम असलेल्या महाराष्ट्राने रविवारी १ सुवर्ण, ४ रौप्य, २ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खात्यावर आता ४१ सुवर्ण, २५ रौप्य, २८ कांस्य अशी एकूण ९४ पदकांची कमाई केली आहे. पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात भक्ती किल्लेदारने सुवर्ण पदक तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांची रौप्य पदके पटकावली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणाच्या पहिल्या दिवशी दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदके जिंकून शानदार सलामी दिली. वेटलिफ्टिंगमध्ये अखेरच्या दिवशी महिलांच्या ८७ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने कांस्य पदक पटकावले. 

वेटलिफ्टिंग - योगिता खेडकरला कांस्य पदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराच्या अखेरच्या दिवशी रविवारी महिलांच्या ८७ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने कांस्य पदक पटकावले. योगिताने ८९ किलो स्नॅच आणि १०९ किलो क्लीन-जर्क असे एकूण १९८ किलो वजन उचलून तिसरा क्रमांक पटकावला. तिने स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. तर तिसऱ्या प्रयत्नात उचललेले ८९ किलो वजन ग्राह्य धरण्यात आले. क्लीन-जर्कमधील तीन प्रयत्नांत तिने अनुक्रमे १०३, १०७ आणि १०९ किलो वजन उचलले. महाराष्ट्राच्या रुचिका ढोरेने ८८ किलो स्नॅच व १०९ किलो क्लीन-जर्क असे १९७ किलो वजन उचलले. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशच्या पूर्णिमा पांडेने १०५ किलो स्नॅच आणि १२२ किलो क्लीन-जर्क असे एकूण २२७ किलो वजन उचलत सुवर्ण पदक मिळवले. केरळच्या एनमारिया टी हिने ८८ किलो स्नॅच आणि ११८ किलो क्लीन-जर्क असे एकूण २०६ किलो वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केले.

वेटलिफ्टिंगमध्ये नऊ पदकांची कमाई

महाराष्ट्राने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात यंदा तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण नऊ पदकांची कमाई केली आहे. अहमदाबादला गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण दोनच पदके मिळवली होती.

पिंच्याक सिल्याट - भक्तीला सुवर्ण पदक; अनुज, ओमकारला रौप्य पदके
 
भक्ती किल्लेदारचे सुवर्ण पदक तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांची रौप्य पदके हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारातील महाराष्ट्राच्या कामगिरीचे वैशिष्ट्य ठरले. रविवारी पिंच्याक सिल्याटच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. कॅम्पाल क्रीडानगरीत झालेल्या पिंच्याक सिल्याटमधील महिलांच्या ८५ ते १०० किलो ओपन-१ गटात महाराष्ट्राच्या भक्तीने अंतिम सामन्यात केरळच्या अथिरा एमएस हिचा पराभव केला. त्याआधी उपांत्य सामन्यात तिने उत्तर प्रदेशच्या शालिनी सिंगला नामोहरम केले.

पुरुषांच्या ८५ ते ९० किलो टँडिंग गटातील अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अनुजला मध्य प्रदेशच्या महेंद्र स्वामीकडून हार पत्करल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत अनुजने गोव्याच्या सागर पालकोंडावर विजय मिळवला. पुरुषांच्या ७० ते ७५ किलो टँडिंग गटाच्या सुवर्ण पदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या ओमकार दिल्लीच्या सूरज कुमारकडून पराभूत झाला. उपांत्य सामन्यात ओमकारने जम्मू काश्मीरच्या मोहम्मद इम्रानला धूळ चारली.

नवख्या खेळात एकूण १७ पदकांसह वर्चस्व

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना ७ सुवर्ण, ५ रौप्य, ५ कांस्य अशी एकूण १७ पदकांची लयलूट केली. या संघाला सुहास पाटील (वरिष्ठ संघ) आणि अभिषेक आव्हाड (कनिष्ठ संघ) यांचे मार्गदर्शन लाभले, तर साहेबराव ओहोळ यांनी व्यवस्थापक पदाची जबाबदारी सांभाळली.

जलतरण - महाराष्ट्राची तीन पदकांची सलामी

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणाच्या पहिल्या दिवशी दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदके जिंकून शानदार सलामी दिली. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मिहीर आंम्ब्रेने पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक जिंकले. त्याने ही शर्यत ५४.३२ सेकंदात पार केली. केरळचा आंतरराष्ट्रीय खेळाडू साजन प्रकाशने या शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना ५३.७८ सेकंद अशी वेळ नोंदवली. मिहीरने महाराष्ट्र रिले शर्यतीतही पदक मिळवून दिले. मित मखिजा, मिहीर, ऋषभ दास, वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने पुरुषांच्या चार बाय ४०० मीटर फ्री स्टाईल रिले शर्यतीत कांस्य पदक जिंकले. त्यांना हे अंतर पार करण्यास ३ मिनिट, २८.७२ सेकंद वेळ लागला. या शर्यतीत कर्नाटक व तमिळनाडू संघांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. महिलांच्या चार बाय ४०० मीटर फ्री स्टाईल रिले शर्यतीत महाराष्ट्रास रौप्यपदक मिळाले. पलक जोशी, आदिती हेगडे, अवंतिका चव्हाण व ऋजुता खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने हे अंतर तीन मिनिटे ५९.६८ सेकंदात पार केले. कर्नाटक संघाने ही शर्यत तीन मिनिटे ५९.५३ सेकंदात पार केली.

ॲथलेटिक्स - प्रणव गुरवच्या रौप्यपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले

प्रणव गुरवने १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले आणि ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या पदकाची नोंद केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव व पूनम सोनुने यांनी १० हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. उत्कंठापूर्ण झालेल्या शर्यतीत पुणे जिल्ह्याचा खेळाडू प्रणवने १०० मीटर्सचे अंतर १०.४१ सेकंदात पार केले. तामिळनाडूच्या एलिक्य दासने ही शर्यत १०.३६ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले.तर सेनादलाच्या सौरभ राजेश (१०.४८ सेकंद) याला कांस्य पदक मिळाले. प्रणव हा पुण्यातील सणस मैदानावर सराव करीत असून त्याने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.

तलवारबाजी - उपांत्यपूर्व फेरीत पराभव 
महाराष्ट्र पुरुष संघाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तलवारबाजी क्रीडा प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. यामुळे संघाचे फॉइल प्रकारातील पदकाचे स्वप्न भंगले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट