Breaking News
भारताचा एव्हरेस्टविर तथा जगातील उंच शिखरे पादाक्रांत करणार्या आनंद बनसोडेला सिंगापूरमध्ये होणार्या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
360 एक्सप्लोररला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचे हे स्वप्न घेऊन कोणतीही बिजनेस पार्श्वभूमी, भांडवल नसताना शून्यातून एका अज्ञात भविष्यात मी उडी घेतली. गेल्या दीड वर्षातील हा प्रवास माझ्यासाठी प्रेरणादायी बनला आहे. वडिलांचे शेवटचे 3600 रु. घेऊन सुरू झालेला प्रवासाने मला Global Entrepreneur बनवले आहे. सिंगापूरमध्ये आता होणार्या कॉन्फरन्समध्ये याच्यासाठीच Speaker व Panelist म्हणून मला खर्पींळींश केले आहे, असे आनंद बनसोडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
एके काळी 9 वी नापास झालेला, बोलण्यात दोष असलेला, डिक्लेक्सीया असलेला, मणक्याच्या आजारात ‘आयुष्यात पुन्हा चालू शकणार नाही’ असे डॉक्टरांकडून ऐकून अंथरुणाला खिळलेला, काही वर्षांपूर्वीच आर्थिक बाबतीत कफल्लक असलेला मी हे सर्व करू शकतोय कारण मी हे करू शकतो हे मला स्वतःला पटवून द्यायचे आहे. माझ्यासारखा भूतकाळ असलेल्या प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी मार्ग मला निर्माण करायचा आहे. हजारो वर्षे दाबून ठेवलेला आणि पोतराजाच्या कुटुंबातील पुढील पिढी किती उंचीवर जाऊ शकते याचे उदाहरण बनायचे आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Suhas Kamble