Breaking News
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण मागच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कांद्याच्या मुद्द्यावर तोडगा निघाला आहे. कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क केंद्राकडून अखेर मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढलेली आहे. कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आला होते. यामुळे अनेक दिवस शेतकरी, व्यापार वर्गाकडून आंदोलन करण्यात येत होते.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्यामुळे राज्यासह देशभरात कांद्याचा दराचा प्रश्न गंभीर झाला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दिवस बाजार समित्या या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. त्याचबरोबर आंदोलने देखील झाली होती. हेच 40 टक्के निर्यातशुल्क मागे घेण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व्यापाऱ्यांकडून सातत्याने होत होती.
अखेर केंद्र सरकारने कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क मागे घेतले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र दुसरीकडे कांदा इतर देशात निर्यात करण्यासाठी 800 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यातमूल्य लागू राहणार असल्याचे अधिसूचना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने काढली आहे. कांद्याचा साठा संपू नये, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, भाव स्थिर रहावे या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
एकीकडे सद्यस्थितीत कांदा दरात वाढ होत असून कांद्याची आवक ही कमी झाल्याचे बाजारात दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडील कांद्याचा साठा संपत आल्याने बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारासह किरकोळ बाजारातील कांद्याचे दर वाढले आहेत. अशातच केंद्र सरकारने कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क मागे घेतले आहे. तर आता कांदा निर्यातीसाठी प्रत्येक टनामागे 800 डॉलर निर्यातशुल्क आकारण्यात येणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे निर्यातशुल्क लागू करण्यात येणार आहेत. एकूणच कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेण्यात आले असले तरीही कांदा निर्यात करण्यासाठी 800 डॉलर मेट्रिक टन ही प्राईस अनिवार्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times