कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदक कमाई

महाराष्ट्र पदकतालिकेत अग्रस्थानावर


क्रीडा प्रतिनिधी, पणजी

गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राकडून वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदककमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके मिळवली, तर जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली. महाराष्ट्राने ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण १२ पदके मिळवून पदकतालिकेत अग्रस्थान राखले आहे. सेनादल दुसऱ्या स्थानावर आहे. 

*

वेटलिफ्टिंग

दोन राष्ट्रीय विक्रमांसह दिपाली गुरसाळेचे सोनेरी यश

मुकुंद आहेरला रौप्य आणि शुभम तोडकरला कांस्य पदक

वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांची कमाई

दिपाली गुरसाळेने गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांसह वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक पटकावले. याचप्रमाणे मुकुंद आहेरने रौप्य आणि शुभम तोडकरने कांस्य पदक प्राप्त केले. कॅम्पल मैदानावर सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तीन पदकांची कमाई केली. 

महिलांच्या ४५ किलो वजनी गटात दीपाली गुरसाळेने स्नॅचमध्ये ७५ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये ९० किलो असे एकूण १६५ किलो वजन उचलले. यातील स्नॅच ७५ किलो आणि एकूण वजन १६५ किलो असे दोन राष्ट्रीय विक्रम तिने नोंदवले. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तरफदारीने एकूण १६२ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले. चंद्रिकाने क्लीन अँड जर्कमध्ये ९५ किलो वजनासह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तर तेलंगणाच्या टी प्रिय दर्शिनीने (१६१ किलो) कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राची आणखी एक स्पर्धक सारिका शिंगरेला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या ५५ किलो गटात आहेरने स्नॅचमध्ये ११२ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये १३७ किलो असे एकूण २४९ किलो वजन उचलले. या गटात सेनादलाच्या प्रशांत कोळीने सुवर्णपदकावर नाव कोरले. प्रशांतने स्नॅचमध्ये ११५ किलो आणि एकूण २५३ किलो वजन उचलून दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. २३० किलो वजन उचलणाऱ्या आंध्र प्रदेशच्या एस गुरू नायडूला कांस्यपदक मिळाले. 

पुरुषांच्या  ६१ किलो वजनी गटात शुभम तोडकरने २६३ किलो वजन उचलून कांस्य पदक संपादन केले. त्याने स्नॅचमध्ये ११५ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये १४८ किलो वजन उचलले. सेनादलाच्या चारू पेसीने २६७ किलोसह सुवर्ण आणि सिद्धांत गोगोईने २६६ किलोसह रौप्य पदक मिळवले.

महिलांच्या ४९ किलो वजनी गटात साक्षी मस्केची कामगिरी सातव्या क्रमांकाची ठरली, तर ५५ किलो गटात अनन्या पाटीलला पाचवा क्रमांक मिळाला.

*

दिपालीची कामगिरी कौतुकास्पद -अजित पवार

महाराष्ट्राची युवा वेटलिफ्टर दिपालीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत दोन विक्रम आपल्या नावे केले  आहेत. तिची हीच कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. यामुळे निश्चितपणे राज्यातील युवा खेळाडूंनाही यातून प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे दिपाली ही महाराष्ट्रातील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. तिच्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिपालीवर कौतुकाचा वर्षाव केला.

*

जिम्नॅस्टिक्स

महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्स संघाला सुवर्ण

*आदर्श भोईरची सुवर्ण कामगिरी; आयुष मुळे, श्रद्धा तळेकरला कांस्य *

जिम्नॅस्टिक्समध्ये चार पदके

गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील  जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारामध्ये बुधवारी महाराष्ट्राने दोन सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली. महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्स सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने एकूण २४०.९० गुणांची कमाई करताना सोनेरी यश मिळवले. या संघात रिचा चोरडिया, संयुक्ता काळे, निशिका काळे आणि किमया काळे यांचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षिका मधुरा तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. जम्मू काश्मीर संघाला रौप्य पदक मिळाले तर हरियाणा संघाला कांस्य पदक मिळाले. 

याचप्रमाणे पुरुषांच्या ट्रॅंपोलिन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या आदर्श भोईरने सुवर्ण आणि आयुष मुळेने कांस्य पदक मिळवले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रामुख्याने सेनादल व केरळच्या खेळाडूंचे आव्हान होते. भोईरने ४८.३७ गुणांची कमाई केली आणि सुवर्णपदक जिंकले. त्याचा सहकारी आयुषने कांस्य पदक मिळवताना ४६.१२ गुण नोंदविले. सेनादलाच्या मनू मुरलीने ४६.७० गुणांसह रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या या दोन्ही खेळाडूंना संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच महिलांच्या सर्वसाधारण विभागात महाराष्ट्राच्या श्रद्धा तळेकरने कांस्यपदक जिंकले. तिला उडीसाची ऑलिम्पिकपटू प्रणिती नायक आणि पश्चिम बंगालची आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणती दास यांचे आव्हान होते. श्रद्धाने त्यांना चांगली लढत दिली आणि ४१.४५ गुणांसह तिसरे स्थान घेतले. नायकने ४५.६० गुणांसह सुवर्णपदक जिंकले तर दासने रौप्यपदक जिंकताना ४३.९५ गुण नोंदवले. 

रग्बी 

महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी 

रग्बी 7-एस स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी झाले. महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटकला ४८-० असे नामोहरम केले. तसेच पुरुष गटात महाराष्ट्राने बिहारचा १९-१२ असा पराभव केला.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट