कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 24 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा तब्बल 309 धावांनी पराभव करून विक्रमी विजय मिळवला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर कांगारूंचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा 5 सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. डच संघाने द. आफ्रिकेविरुद्धचा एकमेव सामना जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा स्वतःचाच विक्रम मोडला. 2015 मध्ये पर्थमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 275 धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारताच्या नावावर आहे. 2023 मध्ये तिरुअनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध 317 धावांनी विजय मिळवला होता.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी बाद 399 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 21 षटकांत 90 धावांत गारद झाला.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडने कांगारू गोलंदाजांसमोर अक्षरश: लोटांगण घातले. 28 धावांवर संघाला पहिला धक्का बसला, त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंगने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्यानंतर मॅक्स औडौड (6), कॉलिन एकरमन (10), बास डी लीडे (4), सायब्रँड एंजेलब्रेक्ट (11) आणि लोगान व्हॅन बीक (0) काही विशेष करू शकले नाहीत आणि ते लवकर बाद झाले. नेदरलँडचे 6 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने 4, मिचेल मार्शने 2 बळी घेतले. तर कमिन्स, स्टार्क, हेजलवूड यांना 1-1 विकेट मिळाली.

मॅक्सवेलचे सर्वात जलद शतक

स्फोटक फलंदाज मॅक्सवेलने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक वेगावान शतक (40 चेंडू) ठोकले. त्याने 240.91 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि फक्त 44 चेंडूत 106 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे.

मॅक्सवेलचे विक्रम

मॅक्सवेल (138) वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. आता फक्त रिकी पाँटिंग (159) आणि अॅडम गिलख्रिस्ट (148) त्याच्या पुढे आहेत. याशिवाय मॅक्सवेलने पॅट कमिन्ससह वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सातव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा (103) विक्रमही केला. या दोघांनी स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन कुल्टर-नाईल (102 विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019) यांचा विक्रम मोडला.

वॉर्नरचे सलग दुसरे शतक

नेदरलँड्सच्या अननुभवी गोलंदाजांची धुलाई करत वॉर्नरने शानदार खेळी केली. या सामन्यात त्याने 111.83 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 93 चेंडूत 104 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 22 वे शतक ठरले. तर या विश्वचषकातील त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले. गेल्या सामन्यात त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध शतक झळकावले होते.

वॉर्नरने तेंडुलकरची बरोबरी केली

वॉर्नरने (6) बुधवारी एकदिवसीय विश्वचषकातील सहावे शतक झळकावले. यासह, त्याने सचिन तेंडुलकरसह विश्वचषकात संयुक्तपणे दुसरे सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज पाँटिंग आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (5-5) तिसऱ्या स्थानावर आहेत. तर या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा 7 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने नेदरलॅन्डसला 400 धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी बाद 399 धावा केल्या होत्या. कांगारू संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी शतके झळकावली. वॉर्नरने सहावे शतक झळकावून माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. तर, मॅक्सवेलने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती खेळी करत अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. 

वॉर्नर आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने 71 आणि मार्नस लॅबुशेनने 62 धावा केल्या. जोश इंग्लिशने 14 आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद 12 धावा केल्या. मिचेल मार्श नऊ धावा करून आणि कॅमेरून ग्रीन आठ धावा करून बाद झाले. मिचेल स्टार्क खातेही उघडू शकला नाही. एडन झाम्पाने एक धाव घेतली. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बास डी लीडने दोन बळी घेतले. तर आर्यन दत्तने एक विकेट घेतली.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट