Breaking News
अकोला: मोहन भागवतांचेभाषण म्हणजे चोराच्या मनातले चांदणे... आपल्या हातात सत्ता आल्यास आपण नरेंद्र मोदी आणि भागवतांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आकोल्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात आज मुख्य भाषण केलंय. ते अकोला येथे बोलत होते. या भाषणात डॉ. भागवत यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मत घेतले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भागवतांच्या याच भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आपल्याला सत्ता मिळाली तर आपण मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, रावणदहनाची प्रथा थांबवली जावी असंही आंबेडकर म्हणालेय. यासाठी संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आंबेडकरांनी केलंय.
67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना सदिच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या मुक्ती लढ्याचा परिपाक, मुक्तीच्या अंतिम शाश्वत मार्गावर ज्या दिवशी आम्ही आरूढ झालो, तो धम्मचक्र प्रवर्तन दिन. क्रांती टिकवायची असेल, तर क्रांतीची मूल्य प्रामाणिकपणे जोपासली पाहिजेत, रुजवली पाहिजेत हेच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. आपणा सर्वांना अशोक विजयादशमी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक सदिच्छा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करुन लाखो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षा भूमीवर बौद्ध धम्माचा स्वीकार केला. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रकाश आंबेडकरांनी शुभेच्छा संदेश दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवला येथे ‘हिंदू धर्मात जन्मलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मांचा अभ्यास करुन जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या आणि भारतीय मातीतील बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याच निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली. नागपूर येथील दीक्षाभूमीवर आज देश-विदेशातून आंबेडकर-बौद्ध अनुयायी येतात आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याठिकाणी लोखांच्या संख्येने पुस्तकांची विक्री होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times