Breaking News
मुंबई- मराठा समाजाची आता ऐकूण घेण्याची मानसिकता राहिली नाही. कुणबी प्रमाणपत्र असलेले लोकही मनोज जरांगे पाटलांच्या सभेला जात आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावरुन जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तोंडात घास आला असताना माती कालवता का? असा सवाल त्यांनी केला आहे.
आरक्षणाला दोन्ही बाजू आहेत. पण, मराठा समाजाच्या तरुण-तरुणींची ऐकून घेण्याची मानसिकता राहिलेली नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये कुणबी प्रमाणपत्र असणारे देखील जाऊन बसतात. त्यांना विचारलं तुम्ही सभेला का जाता, तर ते म्हणतात सगळे जातात म्हणून आम्हीपण जातो.अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.
जरांगे पाटील यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावरुन प्रतिक्रिया दिली. तुम्ही आमच्यामध्ये फूट पाडण्याचं ठरवलंय का? ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडू नका. आम्ही भाऊ-भाऊ आहे. आम्ही येणारच. जी तुमची भावना आहे ती त्यांची भावना नाहीये. त्यामुळे ते सभेला येतात असं जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, ’त्यांना वाटतंय गोरगरिब मराठ्यांना मदत करावी. त्यामुळे ते येतात. तुम्ही याच्यासाठी बाहेर पडलात का? इतके दिवस तुम्ही मराठा आरक्षणावर आणि आंदोलनावर बोलले नाही. आता हे तुम्ही सुरु केलंय का? सरकारने आता तुम्हाला पुढे केलंय का? आमच्यात मिठाचे खडे का टाकता? आमच्यातली ऐकी तुम्हाला बघवत नाहीये. पण, आम्ही भाऊ-भाऊ आहोत.’
आमच्या तोंडामध्ये घास आलाय त्यात माती तुम्हाला कालवायची आहे का? तुम्हाला कोणी बंधन टाकलंय का येऊ नये म्हणून. लोक येताहेत, पाठिंबा देत आहेत. गोरगरिबांचे कल्याण होईल. मग, तुमच्या पोटात का दु:खतंय, असा सवाल जरांगेंनी अजित पवारांना केला.
आम्ही हातघाई केली नाही. चार दिवसात होणार नाही म्हणून सरकारने एक महिना मागितला. आम्ही चाळीस दिवस दिले. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. आता आम्हाला चॉकलेट फेकून मारत आहात का? मराठा समाजाला दगाफटका केल्यास तुमच्यासाठी चांगलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान आम्ही ठेवला आहे. आता त्यांनी प्रामाणिक राहावं, असं ते म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times