Breaking News
मराठा समाजाला आरक्षण मिळणार हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. त्यामुळे थोडा धीर धरा, सरकारला जरा वेळ द्या, आरक्षण मिळणारच आहे, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे येथे टेंभी नाका येथे पत्रकारांशी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या करणे ही बाब अत्यंत दु:खद आहे.
मराठा आरक्षण लागू करण्यासाठी अनेक कायदेशीर बाबी आहेत, त्या पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी थोडा धीर धरावा. आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वोतेपरी प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
मी दिलेला शब्द पाळणारच. अतिशय संवदेनशील घटना घडत आहे. त्यामुळे कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कुणबी प्रमाणपत्रावर युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. ज्याप्रमाणे सरकारने शब्द दिला आहे, त्याचप्रमाणे या मुद्द्यावर काम सुरु आहे. आपल्या मराठा समाजातील तरुणांचा जीव इतका स्वस्त नाही.
म्हणून या तरुणांनी त्यांच्या घरच्यांचा विचार करायला हवा. मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्यानुसार आम्ही मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ देण्याचे प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.
दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही मराठा समाजाच्या बाजूनेच आहोत. मी कोणतीही खोटी आश्वासने देत नाही. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times