कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अकोल्यात रावण मंदिराचे भूमिपूजन

अकोला : राज्यात रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार, प्रवक्ते अमोल मिटकरींनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावाला भेट दिली. या गावात रावण मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.  त्यांनी आपल्या आमदार निधीतून सांगोळ्यातील सभागृह बांधकामासाठी दिलेल्या 20 लाखांच्या निधीच्या कामाचं भूमिपूजन केलंय. सांगोळा गावात 350 वर्ष जुनी रावणाची मूर्ती आहे. या संपूर्ण गाव दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करण्यात येते. 

भूमिपूजनानंतर अमोल मिटकरी यांनी म्हटले की, रावण हे आदिवासींचे दैवत असेल तर रावण दहन कशाला, आदिवासी बांधवांची भावना रावणासोबत असेल तर रावण दहनाला बंदी घातली पाहिजे. लंकेचा राजा आणि शिवभक्त असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन कशाला? आम्ही रामाची पूजा करतो, पण रावणाचे दहन कशाला असा सवाल त्यांनी केला. रावण दहनावर बंदी घालण्यासाठी आपण विधीमंडळात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

अन्याय, अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या  दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला असल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार देशभरात हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून आदिवासी संघटनांकडून याला विरोध केला जात आहे. भंडारा जिल्ह्यात यावर्षी आदिवासी समाज बांधवांनी या रावण दहनला प्रचंड विरोध केला आहे. रावण दहन केल्यास अनुसूचित जमाती समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. अखिल भारतीय आदिवासी परिषद,  ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशनच्या वतीनं तसं पत्र भंडारा जिल्हा प्रशासनाला दिलं आहे. 

या पत्राच्या अनुषंगाने भंडाऱ्याच्या अतिरिक्त जिल्हा न्याय दंडाधिकारी लीना फालके यांनी एक आदेश बजावला आहे. या आदेशानुसार आदिवासी महात्मा राजा रावण यांच्या पुतळ्याचे दसऱ्याच्या दिवशी दहन करणाऱ्या व्यक्ती किंवा मंडळावर गुन्हे दाखल करावे, असं या आदेशात नमूद आहे. सध्या हे पत्र समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, याबाबत फालके यांचे दोन पत्र व्हायरल होत आहे. दुसऱ्या पत्रात कोणताही आदेश नमूद नाही. 

भंडारा जिल्ह्यात रावण दहनाला मनाई

भारतातील काही आदिवासी समुदायांमध्ये रावणाची पूजा केली जाते. भंडारा जिल्ह्यातील काही आदिवासी संघटनांनी रावण दहनावर बंदी घालण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात रावण दहनास मनाई करण्यात आली आहे. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट