Breaking News
मुंबई : “हे कंत्राटी कामगारांच्या संबंधितचा अस्वस्थता कशाची होती. येथे नोकरी राहणार का यासंदर्भात काही माहिती नाही. या ठिकाणी ठरावी काळासाठी नोकरी आहे. 10-11 महिन्यासाठी नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्य स्थैर्य नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने जागा भरणे योग्य नाही. हा आमचा आग्रह होता आणि त्याबद्दलची भूमिका शरद पवार यांनी मांडली.”
राज्यातील वादग्रस्त असलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यावेळी कंत्राटी भरती ही महाविकास आघाडी सरकारचे हे पाप आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. महाविकास आघाडी सरकारने आता महाराष्ट्रीची माफी मागावी लागणार आहे. कारण महाविकास आघाडीने राज्यातील युवकांची दिशाभूल केल्याबद्दल, स्वत:चे पाप दुसऱ्यांच्या माथी मराल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यावर कंत्राटी भरतीवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले आहे.
कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला असून मागच्या सरकारचे हे पाप होते आणि तुमच्या आशीर्वादाने हा निर्णय घेतल्याचा आरोपा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार म्हणाले, “माझा आशीर्वाद असल्याचे मी वाचले होते. मी काय मंत्री मंडळाच्या बैठकीला जात नाही. पण महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही मला एकाचे मत सांगितले तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्यावर वक्तव्य केले आहे. त्यात स्पष्ट दिसते की, ज्यावेळी यासंबंधित निर्णय घेतला गेला. त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची सहमती होती आणि आज त्यासहमतीबाबत भाष्य देखील करत नाहीत.”
कंत्राटी भरतीचा निर्णय घेताना सध्या सरकारमध्ये असलेल्या लोकांची सहमती असल्याच आरोपही शरद पवारांनी केला आहे. यासंदर्भात शरद पवार म्हणाले, “आज देवेंद्र फडणवीसांनी जे काही मत मांडले, यात यापूर्वीच्या त्यांच्या सरकारने किंवा त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी कंत्राटी भरती निर्णयाला सहमती दिली होती आणि त्यांच्या सहमतीने निर्णय झाले होते. ही गोष्टी लपवण्यात अर्थ नाही.”
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेंटला दोन दिवस शिल्लक राहिले आहे, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “राज्य सरकारचे काही सुसंवाद झाल्याचे दिसते. राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसात सरकारची भूमिका स्पष्ट होईल, असे दिसत आहेत. यातून मराठा आरक्षणाबाबतचा प्रश्न सुटला तर आम्हाला त्यांचा आनंदच आहे.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times