Breaking News
जालना : मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, अशी तीव्र भूमिका मराठा समाजाकडून घेण्यात आली आहे. मराठा आंदोलक मराठा मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्याकडे महिन्याभराची मुदत मागत त्यांचे हे आंदोलन मागे घेतले. परंतु सरकारला मराठा समाजाने दिलेली ही मुदत आता काही दिवसांत संपत असल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता 24 तारखेनंतरची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी सरकारकडे केवळ 48 तास शिलल्क राहिले आहेत. त्यामुळे सरकारने 24 तारखेला आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून जरांगे पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत 24 तारखेनंतरची आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने जर 24 तारखेला मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषणला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. त्या उपोषणात पाणी, अन्न, औषधे सर्वांचा त्याग करण्यात येईल. आरोग्य सेवा, पाणी किंवा अन्न असे काहीही घेण्यात येणार नाही. तर आमच्या गावात एकाही महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याआधी कोणत्याही राजकारण्याला गावात येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचे अन्यथा यायचे नाही. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण हे सर्व गावाच्यावतीने एकाच ठिकाणी सुरू केले जाणार आहे. हे साखळी उपोषण राज्यभर होईल. 28 तारखेपासून या साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात होईल. या उपोषणासाठी आंदोलकांना कायमस्वरूपी उपोषणाला बसावे लागले. प्रत्येक तालुक्यातील आणि गावातील मराठा आंदोलकांनी एकत्र येऊन कॅंडल मार्च काढायचे. हे शांततेचे आंदोलन सुरू झाल्यानंतर 25 तारखेला पुन्हा सरकारला न पेलावणारी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. कारण दोन टप्पे पाडल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. कारण हे उपोषण आणि साखळी उपोषण हे मराठा समाजातले लोक सुरू करणार आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
पण 25 तारखेला ला 28 तारखेची दिशा स्पष्टपणे सांगितली जाणार आहे. हे आंदोलन सरकारला सोपे वाटत असले तरी हे सरकारला झेपणारे नाही. हे शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही. या विषयाची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला देण्यात आला आहे. तर कोणीही उग्र आंदोलन किंवा आत्महत्या करायची नाही. कारण मला तुमची गरज आहे. शांततेने केलेले आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे. आपली जात खूप दिवसांपासून त्रास सहन करत आहे. तुमच्या विचारांत आजपासून बदल करा आणि गोरगरीब समाजाला न्याय मिळवून द्यायला माझ्या खांद्याला खांदा लावून काम करा, असे आवाहनही यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील आंदोलकांना केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times