Breaking News
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद
पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी
(दि.२१) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये चहापान झाले.
वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या स्तरावर महाविकासआघाडीत आणि देशाच्या पातळीवर ‘इंडिया’ आघाडीत सहभागी करून घेण्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावरून अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले. अशातच शनिवारी (२१ ऑक्टोबर) शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट झाली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार यांच्याबरोबरच्या आजच्या भेटीत महाविकासआघाडी किंवा इंडियात सहभागी होण्याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. देशातील आगामी ५ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडले, असं मला वाटत नाही.”
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ऐतिहासिक ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका संस्थेच्यावतीने शनिवारी प्रतिष्ठानच्या सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात सकाळी शरद पवार यांनी सहभाग घेतला होता. आपले विचार मांडल्यानंतर ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आपल्या कार्यालयात बसले होते. (Maharashtra Politics)
पवार यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी या ग्रंथामागील बाबासाहेबांची
भूमिका स्पष्ट केली. त्यांचे भाषण संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या
नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेडकर यांना पवार यांच्यासोबत चहापान
घेण्याचे विनंती केली.
राजकीय चर्चा न करता या दोन्ही नेत्यांमध्ये सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times