कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

इंग्लंडचे सपशेल लोटांगण

यंदाच्या वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी अपेक्षाप्रमाणे झालेली नाही. आज दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ४०० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सपशेल लोटांगण घातले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दाेन्‍ही आघाड्यांवर इंग्लंडने सुमार कामगिरी केली. यामुळे  दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा डाव १७०  धावांवर गुंडाळत २२९ धावांनी मोठा विजय मिळवला. या नामुष्‍कीजनक पराभवामुळे  इंग्लंडचा  स्‍पर्धेतील प्रवास खडतर बनला आहे.  

द. आफ्रिकेने केली इंग्‍लंडच्‍या गोलंदाजांची धुलाई, तब्‍बल ४०० धावांचे लक्ष्‍य

इंग्‍लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हेनरिक क्लासेनने धडाकेबाज शतक केले. रॅसी व्हॅन डर डुसेन, रीझा हेंड्रिक्स आणि मार्को जॅनसेन यांनी अर्धशतके झळकावली. क्लासेनने ६७ चेंडूत १०९ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. हेंड्रिक्सने ७५ चेंडूत ८५ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. मार्को यानसेनने ४२ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले. ड्युसेनने ६१ चेंडूंत ६० धावा केल्या. डेव्हिड मिलर ५ धावा करून बाद झाला, क्विंटन डी कॉकने ४ आणि जेराल्ड कोएत्झीने ३ धावा केल्या. केशव महाराज १ धाव घेत नाबाद राहिला.  क्लासेन, रॅसी व्हॅन डर डुसेन, रीझा हेंड्रिक्स आणि मार्को जॅनसेन यांच्या धडाकेबाज खेळीमुळे द. आफ्रिकेने ३९९ धावांपर्यंत मजल मारली.  इंग्लंडकडून रीस टोपलीने तीन बळी घेतले. गस अॅटिन्सन आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (ENG vs SA)

इंग्लंडचे दिग्गज फलंदाज न लढताच माघारी

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडने ६ षटकात ३ विकेट गमावल्या. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो १२ ​​चेंडूत १० धावा करून बाद झाला. त्याला लुंगी एनगिडीने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या हाती झेलबाद केले. त्याच्यापाठोपाठ जो रूटही पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्को यान्सेनच्या चेंडूवर तो डेव्हिड मिलरकरवी झेलबाद झाला. रूटने स६हा चेंडूत ३ धावा केल्या. यानंतर सहाव्या षटकात डेव्हिड मलानच्या रूपात इंग्लंडला तिसरा झटका बसला. त्याला मार्का जान्सेनने विकेटकीपर क्विंटन डी कॉक करवी झेलबाद केले. मलानने आपल्या खेळीत ११ चेंडूत ६ धावा केल्या.

सामन्याच्या ११ व्या ओव्हरमध्ये जॉस बटलरच्या रूपात इंग्लंडला पाचवा धक्का बसला. त्याला जेराल्डने क्विंटन डी कॉक करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत ७ बॉलमध्ये १५ धावा केल्या. याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जेराल्डने हॅरी ब्रुकला एलबीडब्ल्यू केले. हॅरीने आपल्या खेळीत २५ बॉलमध्ये १७ धावांची खेळी केली.

आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ९ षटकांमध्ये ५० धावांवर इंग्लंडचे ४ फलंदाज बाद झाले. यामध्ये जॉनी बेअरस्टो १०, जो रूट ३, डेव्हिड मलान ६, बेन स्टोक्स ५,  जॉस बटलर १५, हॅरी ब्रुक १७, आदिल राशिद १० आणि डेव्हिड विली १२ धावांवर बाद झाले.  गस ऍटकिन्सन आणि मार्क वूड यांनी अखेरीस दिलेली झुंज इंग्लंडला सामन्यात विजय मिळवून देवू शकली नाही. ऍटकिन्सन आणि मार्क वूड ३३ चेंडूमध्ये ७० धावांची भागिदारी केली. परंतु,  केशव महाराजने गस ऍटकिन्सनला बोल्ड करत इंग्लंडचा डाव १७० धावांवर गुंडाळला.

द. आफ्रिकाकडून गोलंदाजीमध्ये जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्याच्यासह कगिसो रबाडा, मार्को जान्सेन यांनी प्रत्येकी २ तर कगिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्ध आजवरची सर्वात मोठी धावसंख्या

या सामन्यात वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने केला. त्यांनी पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानने २०१९ मध्ये आठ विकेट्सवर ३४८ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची ही कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकले. २०१५ मध्ये न्यूझीलंडने ओव्हलवर पाच विकेट्सवर ३९८ धावा केल्या होत्या.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट