Breaking News
यंदाच्या वन-डे विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी अपेक्षाप्रमाणे झालेली नाही. आज दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ४०० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सपशेल लोटांगण घातले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दाेन्ही आघाड्यांवर इंग्लंडने सुमार कामगिरी केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा डाव १७० धावांवर गुंडाळत २२९ धावांनी मोठा विजय मिळवला. या नामुष्कीजनक पराभवामुळे इंग्लंडचा स्पर्धेतील प्रवास खडतर बनला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हेनरिक क्लासेनने धडाकेबाज शतक केले. रॅसी व्हॅन डर डुसेन, रीझा हेंड्रिक्स आणि मार्को जॅनसेन यांनी अर्धशतके झळकावली. क्लासेनने ६७ चेंडूत १०९ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. हेंड्रिक्सने ७५ चेंडूत ८५ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. मार्को यानसेनने ४२ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले. ड्युसेनने ६१ चेंडूंत ६० धावा केल्या. डेव्हिड मिलर ५ धावा करून बाद झाला, क्विंटन डी कॉकने ४ आणि जेराल्ड कोएत्झीने ३ धावा केल्या. केशव महाराज १ धाव घेत नाबाद राहिला. क्लासेन, रॅसी व्हॅन डर डुसेन, रीझा हेंड्रिक्स आणि मार्को जॅनसेन यांच्या धडाकेबाज खेळीमुळे द. आफ्रिकेने ३९९ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून रीस टोपलीने तीन बळी घेतले. गस अॅटिन्सन आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (ENG vs SA)
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडने ६ षटकात ३ विकेट गमावल्या. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो १२ चेंडूत १० धावा करून बाद झाला. त्याला लुंगी एनगिडीने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या हाती झेलबाद केले. त्याच्यापाठोपाठ जो रूटही पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्को यान्सेनच्या चेंडूवर तो डेव्हिड मिलरकरवी झेलबाद झाला. रूटने स६हा चेंडूत ३ धावा केल्या. यानंतर सहाव्या षटकात डेव्हिड मलानच्या रूपात इंग्लंडला तिसरा झटका बसला. त्याला मार्का जान्सेनने विकेटकीपर क्विंटन डी कॉक करवी झेलबाद केले. मलानने आपल्या खेळीत ११ चेंडूत ६ धावा केल्या.
सामन्याच्या ११ व्या ओव्हरमध्ये जॉस बटलरच्या रूपात इंग्लंडला पाचवा धक्का बसला. त्याला जेराल्डने क्विंटन डी कॉक करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत ७ बॉलमध्ये १५ धावा केल्या. याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जेराल्डने हॅरी ब्रुकला एलबीडब्ल्यू केले. हॅरीने आपल्या खेळीत २५ बॉलमध्ये १७ धावांची खेळी केली.
आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ९ षटकांमध्ये ५० धावांवर इंग्लंडचे ४ फलंदाज बाद झाले. यामध्ये जॉनी बेअरस्टो १०, जो रूट ३, डेव्हिड मलान ६, बेन स्टोक्स ५, जॉस बटलर १५, हॅरी ब्रुक १७, आदिल राशिद १० आणि डेव्हिड विली १२ धावांवर बाद झाले. गस ऍटकिन्सन आणि मार्क वूड यांनी अखेरीस दिलेली झुंज इंग्लंडला सामन्यात विजय मिळवून देवू शकली नाही. ऍटकिन्सन आणि मार्क वूड ३३ चेंडूमध्ये ७० धावांची भागिदारी केली. परंतु, केशव महाराजने गस ऍटकिन्सनला बोल्ड करत इंग्लंडचा डाव १७० धावांवर गुंडाळला.
द. आफ्रिकाकडून गोलंदाजीमध्ये जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्याच्यासह कगिसो रबाडा, मार्को जान्सेन यांनी प्रत्येकी २ तर कगिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या सामन्यात वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने केला. त्यांनी पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानने २०१९ मध्ये आठ विकेट्सवर ३४८ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची ही कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकले. २०१५ मध्ये न्यूझीलंडने ओव्हलवर पाच विकेट्सवर ३९८ धावा केल्या होत्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times