Breaking News
मुंबई,: महिलांना कौशल्य-विकास आणि उद्योजकतेच्या संधी प्रदान करण्यासाठी काम करणारा स्किलटेक प्लॅटफॉर्म हुनर ऑनलाईन कोर्सेसने भारतात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या एका कार्यक्रमात हुनर ऑनलाईन कोर्सेसने गुंतवणूकदार शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यासह २८ राज्यांमध्ये ५५००० पेक्षा जास्त महिला उद्योजिकांना तयार करण्याच्या आपल्या वाटचालीचा तसेच भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोण्याच्या यशाचा आनंद साजरा केला.
यावेळी प्रेरणादायी ब्रँड फिल्म्सचा वर्ल्ड प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या फिल्म्समध्ये दृढ निर्धार बाळगणाऱ्या भारतीय महिलांच्या वास्तविक जीवन कहाण्या सांगितल्या गेल्या आहेत, ज्यांनी आव्हाने दूर करण्यासाठी आपली आंतरिक शक्ती व कौशल्यांचा वापर करून लक्षणीय यश संपादन केले आहे. या फिल्म्समधून त्यांची जीवन वाटचाल स्क्रीनवर आणताना काव्यात्मक व लयबद्ध शैलीचा वापर केला गेला आहे.
सर्व २८ राज्यांमधील ६००० पेक्षा जास्त लहान-मोठ्या गाव-शहरांमधील ३० लाखांपेक्षा जास्त महिलांमध्ये गृहिणी, विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांचा समावेश आहे, यापैकी ३०% महिलांनी सरकारने प्रमाणित केलेले फॅशन, खाद्यपदार्थ आणि सौंदर्य कौशल्ये कोर्सेस शिकून स्वतःचे व्यवसाय यशस्वीपणे चालवले आहेत. महिला उद्योजकांसह प्रगती करणे राष्ट्र निर्माण करण्याचे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी, हुनर ऑनलाइन कोर्सेसने शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यासोबत गुंतवणूकदार आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून हातमिळवणी केली आहे.
हुनर ऑनलाइन कोर्सेसच्या सीईओ, निष्ठा योगेश म्हणाल्या, “कौशल्ये संपादन करून महिलांची उन्नती घडवून आणण्याच्या आमच्या मिशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही आमच्या गुंतवणूकदार आणि भागीदार शिल्पा शेट्टी कुंद्रा, आमच्या गुरु नीता लुल्ला आणि सर्व उपस्थितांचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम कौशल्य शिक्षण आणि सशक्तीकरणाच्या परिवर्तनकारी शक्तीचे प्रतीक आहे. देशभरातील महिलांच्या उज्वल भवितव्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे आणि समाजाच्या आकांक्षांना आवाज मिळाला आहे. मला आनंद आहे की आपण, एक देश म्हणून, महिलांच्या शक्तीचे समर्थन करतो, परंतु आपल्याला अद्याप खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. उद्योजकीय संधी आणि कौशल्यांसह महिलांना शिक्षण, समर्थन आणि सक्षम करण्यात गुंतवणूक करण्याच्या हुनरच्या वचनबद्धतेमुळे भारतातील महिलांच्या शक्तीचा उपयोग करून अर्थव्यवस्थेत अतुलनीय परिवर्तन घडून येईल!”
या प्रेरणादायी ब्रँड फिल्म्समध्ये दाखवण्यात आले आहे की कसे या महिलांनी त्यांची आयुष्यभराची स्वप्ने सत्यात उतरवण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले, दररोज शिकत असताना त्यांनी स्वत:चे नाव आणि नवीन ओळख निर्माण केली. या चित्रपटांचे नरेशन शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी केले आहे, ज्यांचा स्वतःचा प्रवास या महिलांसारखाच प्रेरणादायी आहे. आपल्या काव्यात्मक आवाजाचा वापर करून, शिल्पा यांनी कौशल्याच्या सामर्थ्यावर असलेल्या आपल्या दृढ विश्वासाचा पुनरुच्चार यामध्ये केला आहे. हुनरच्या ब्रँड फिल्म्स देशभरातील महिलांना प्रेरणा देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्या सांगतात की, स्वत:वर विश्वास ठेवा आणि तुमच्या कौशल्याच्या जोरावर आर्थिक स्वावलंबन आणि सन्मानाकडे वाटचाल करा.
उत्कृष्ट कथाकथन आणि मनमोहक व्हिज्युअलद्वारे, हे चित्रपट स्त्रियांच्या शिकण्याच्या, वाढण्याच्या, आत्मविश्वास मिळवण्याच्या आणि त्यांच्या कौशल्याच्या बळावर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या, त्यांच्या जीवनात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याच्या कथा सांगतात.
अभिनेत्री, उद्योजक, हुनर ऑनलाइन कोर्सेसमधील गुंतवणूकदार शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी हुनरची उल्लेखनीय प्रगती आणि महिलांमधील कौशल्य विकासाची वाढती मागणी पूर्ण करण्यात हुनरच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “जेव्हा आपण आपली क्षमता, आपली वैशिष्ट्ये ओळखतो आणि स्वप्नांचा पाठपुरावा करतो, तेव्हा सशक्तीकरण सुरू होते. महिलांना कौशल्ये प्रदान करणे आणि त्यांना पाठिंबा देण्याबरोबरीनेच त्यांना उद्योजिका बनवणे हा केवळ एक प्रयत्न नाही तर मोठ्या क्रांतीच्या दिशेने उचलले गेलेले पाऊल आहे. अशी क्रांती ज्यामध्ये रुढिवाद तोडून महिलांचा मार्ग खुला केला जाईल. हुनरसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे आणि मी ते सकारात्मक परिवर्तन पाहण्यासाठी उत्सुक आहे जी असंख्य महिलांच्या जीवनात घडून येईल."
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मैलाचा टप्पा ठरलेल्या या कार्यक्रमाचा समारोप, हुनरच्या विद्यार्थ्यांच्या व्हिडिओ टेस्टिमोनियल्सच्या हृदयस्पर्शी मालिकेने झाला, ज्यामध्ये त्यांचा परिवर्तनीय प्रवास दाखवण्यात आला. या कथा भारतीय महिलांवर आपल्या प्रभावाची आठवण करून देत राहतील आणि त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करतील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times