Breaking News
सिडनी (ऑस्ट्रेलिया): औरंगाबाद येथील 11 वर्षाच्या विहान गायकवाड सहित भोपाळ येथील ज्योती रात्रे, राहुल व सुप्रिया गायकवाड व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माउंट कोझिस्को सर करून शिखरावर भारताचा तिरंगा फडकवला. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिखर सर करून टीम 360 एक्सप्लोरर शिखरावर पोहचली. यापूर्वी 2014 मध्ये आनंदने ऑस्ट्रेलियातील १० सर्वोच्च शिखरे “ऑसी-१०” म्हणजेच ऑस्ट्रेलिया खंडातील 10 सर्वोच्च शिखरे सर केली होती. 2014 मध्ये ही शिखरे सर करणाऱ्या पहिल्या भारतीय टीमचे नेतृत्व आनंदने केले होते.
भोपाळ येथील ज्योती रात्रे या 54 वर्षाच्या असून त्या 360 एक्सप्लोरर मार्फत सात खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याच्या मोहिमेवर आहेत. आतापर्यंत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माउंट किलीमांजारो, माउंट एलब्रूस, माउंट आकांकगुआ, व एव्हरेस्टवर 8200 मीटरपर्यंत चढाई केली आहे. 54 वर्षाच्या ज्योती यांनी या वयात जगातील सर्वोच्च शिखरे सर करत अनेक सर्व महिलांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
11 वर्षाचा विहान गायकवाड हा मूळचा औरंगाबादचा असून राहुल व सुप्रिया गायकवाड या आईवडिलांसोबत त्याने शिखरावर पाऊल ठेवले. औरंगाबादयेथील सिडको कॉलनी मध्ये राहणाऱ्या रिटायर्ड बँक मॅनेजर रमेश गायकवाड यांचा विहान गायकवाड हा नातू असून या यशाने संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने फुलली आहे.
शिखरावर 42 सेकंदात रुबिक क्यूब-
11 वर्षाच्या विहानने ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखरावर 42 सेकंदात रुबिक क्यूब सोडवून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. विहान गेले 3 वर्ष रुबिक क्यूबची प्रॅक्टिस करत असून शिखरावर पोहचल्यानंतर अवघ्या 42 सेकंदात त्याने हे करून दाखवले आहे.
360 एक्सप्लोरर मार्फत आनंद बनसोडे जगभरातील सर्वोच्च शिखरे सर करण्याच्या मोहिमा आयोजित करत असतात. 2014 व 2023 मध्ये 2 वेळा आनंदने माउंट कोझिस्को शिखर सर केले आहे. माउंट एलब्रूस, माउंट किलीमांजारो व माउंट कोझिस्को ही शिखरे 2 वेळा सर केली आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Suhas Kamble