ललित पाटील प्रकरणात आणखी काही तथ्य लवकरच समोर येतील, असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला आज अंधेरी न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला न्यायलयात हजर करण्यात आले होते. “पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका आहे”, असा दावा ललित पाटील यांनी न्यायालयात केला आहे.
ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ड्रग्ज प्रकरणात मोठे लागे बंदे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्या दिशेने तपास करण्यात आला. सर्व युनिट कामाला लागले असून तपास करत असताना मुंबई पोलिसांना नाशिकमधील कारखान्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी नाशिकच्या कारखान्यावर छापा टाकला. राज्यातील ज्या वेगवेळ्या ठिकाणी ड्रग्जचे काम सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. यानंत पोलिसांच्या हाती ललित पाटील आला. या प्रकरणातून निश्चित मोठे धागेदोरे बाहेर येतील, काही गोष्टी ज्या मला कळाल्या असून मी त्या तुम्हाला सांगू शकत नाही. योग्य वेळी मी ऐवढेच सांगतो की, या प्रकरणातून मोठा नेटवर्क बाहेर काढणार आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times