Breaking News
मिरा भाईंदर
महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक 03 कार्यक्षेत्रामधील अनधिकृत बांधकामावर पोकलॅन ,जेसिबी व
मनुष्यबळाच्या सहाय्याने महानगरपालिकामार्फत कारवाई करण्यात आली. मिरा भाईंदर
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई
करण्यात येत आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव
काटकर (भा.प्र.से.) यांनी विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणेकामी
निर्देशित करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्या निर्देशानुसार प्रभागातील अनधिकृत
बांधकामे,
अनधिकृत
सीसीटीव्ही यंत्रणा स्मार्टपोल, फेरीवाले, गॅरेजेस,
पदपथावरील
व्यावसायिक,
अनधिकृत
हॉटेल/बार,
अनधिकृत
होर्डिंग्ज,
अनधिकृत
झोपड्या यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी प्रभाग
समिती क्रमांक 03
कार्यक्षेत्रातील
भाईंदर पूर्वे ,
इंद्रलोक
पोलीस चौकी समोर व आरक्षण क्र.122 ड समोर कांदळवन
क्षेत्रात मौजे नवघर,
सर्वे
क्र. 13 या ठिकाणी 43 रहदारी
झोपड्यांचे अनधिकृत बांधकामा व मौजे नवघर सर्वे क्र . 24 या ठिकाणी 15 झोपड्याचे
बांधकामावर 1
पोकलॅन
, 1 जेसीबी व
मनुष्यबळाच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मा. आयुक्त तथा
प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त
(अतिक्रमण) मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई
प्रसंगी अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण , सहा.आयुक्त जितेंद्र
कांबळे, कनिष्ठ अभियंता
योगेश भोईर,
चंचल
ठाकरे, फेरीवाला पथक
प्रमुख राकेश त्रिभुवन किरण जाधव ,लिपिक वसंत
पेंढारे ,
अतिक्रमण
विभागाचे पोलीस अधिकारी धम्मा लोखरे व पोलीस कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे
कर्मचारी,
महाराष्ट्र
सुरक्षा बलाचे जवान यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times