कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर आता कामगार संघटनांना लढा अधिक तीव्र करावा लागेल! कामगार संघटनांचा एकमुखी निर्धार


   मुंबई दि.२:केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण कामगार वर्गाचे खच्चीकरण करणारे असून फोर लेबर कोड बिल तर मालकांपुढे पायघड्या घालणारे आणि कामगार तसेच कामगार चळवळीचे अस्तित्व धोक्यात आणणारे आहे या विरुद्ध आता रस्त्यावर उतरून कणखरपणे लढण्याचा निर्धार उपस्थित कामगार संघटनांनी काल केला आहे. 

    कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काल परेलच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात १मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्य वर्धापनदिनाच्या औचित्याने भव्य सभा  पार पडली.

   राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या प्रोत्साहनाने आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या सहकार्याने हा समारंभ पार पडला.

  सभेमध्ये शेतक री कष्टकरी कामगार आणि महागाईवाढ बेरोजगारीच्या वणव्यात होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी कामगार चळवळीने आता राजकीय चळवळ उभी करणे काळाची गरज आहे असे उपस्थित नेत्यांनी म्हटले आले

    सर्व कामगार संघटनानी मतभेद विसरून एकजुटीने लढा देण्याची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी केले आहे.

   तत्पूर्वी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने  जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या पुढाकारा ने परेल रेल्वे स्टेशन पूर्व ते राष्ट्रीय मिल मजदुर संघ कार्यालया पर्यंत कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चामध्ये मोदी हटाव देश बचाव  कामगार विरोधी  शेतकरी विरोधी जनता विरोधी सरकारचा निषेध असो कामगार एकजुटीचा विजय असो हम सब एक है  अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.या मोर्चाचे रूपांतर  नंतर राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या सभागृहातील सभेत झाले. या सभेत कामगार नेत्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन  कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की केंद्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली यापुढे वर्षभर आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तीन महिन्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध प्रचंड मोर्चा काढला जाईल. शेतकऱ्यांनी एक वर्षभर संघर्ष करून केंद्र सरकारला कायदे मागे घेण्यास भाग पाडले कामगारांनी देखील अशा प्रकारे एकजुटीने लढा दिला पाहिजे.असंघटित कामगारांना संघटित केल्याशिवाय  कामगारांना न्याय मिळणार नाही. त्यासाठी संघटित क्षेत्रातील सर्वच कामगार नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची काळाची गरज आहे असे म्हटले आहे. 

   कामगार संघटनांनी  सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन कामगारांच्या अन्यायावर दाद मागण्याचा या प्रसंगी मनोदय व्यक्त करण्यात आला  तळागाळातील  सामान्य शेतकरी व कामगारापर्यंत हा संदेश पोहोचवा या साठी जनजागृती करण्यात येणार आहे.     

  येणाऱ्या २०२४ च्या  विधानसभा निवडणु कीमध्ये झोपडपट्टी गल्लीबोळात जाऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध  प्रचार करण्याची गरज आहे असे सर्वच कामगार नेत्यांनी या सभेत प्रतिपादिले.

   याप्रसंगी महाराष्ट्र एच.एम.एस.चे अध्यक्ष शंकर साळवी जनरल सेक्रेटरी संजय वढावकर खजिनदार निवृत्ती धुमाळ, कार्यकारिणी सदस्य कल्पना देसाई  म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव समन्वय समितीचे निमंत्रक कॉ. एम. ए. पाटील इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते दिवाकर दळवी  निवृत्ती देसाई  सिटूचे कॉ.विवेक मॉन्टेरो  सैहीद अहमद  एआयसीसीचे विजय कुलकर्णी   आयटकचे कॉ उदय चौधरी कॉ आरमाईटी इराणी कॉ.पी.एम वर्तक आदी मान्यवर कामगार नेत्यांची  मार्गदर्शनपर भाषणे झाली. 

  महाराष्ट्र इंटकने काळ्या फितीचे आयोजन करुन केंद्र तसेच राज्य सरकारने कामगार विरोधी धोरण अवलंबिले त्या चा निषेध केला.परेल येथील कामगार मैदानावरील हुतात्मा 

गिरणी कामगार 

बाबू गेणू यांच्या पुतळ्याला गोविंदराव मोहिते यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले आणि स्वातंत्र्य लढ्यातील कामगारांच्या स्मृती जागवल्या

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट