Breaking News
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सगळ्यांना आपल्या विळख्यात खेचत आहे. मग यामध्ये सामान्य माणसापासून अगदी राजकीय, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रामधील व्यक्तींचा सुद्धा समावेश झाला आहे. राजकीय क्षेत्रातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे, आधी वर्षा गायकवाड, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि आता सुप्रिया सुळे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असताना राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांच्या लग्नामध्ये होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान लग्नांमध्ये उपस्थिती लावणाऱ्या अनेक नेत्यांना कोरोना लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली नसल्याची माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे. या ट्विट मध्ये सुप्रिया सुळे यांनी “मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या,” असे म्हटले आहे. तूर्तास तरी या कोरोनाने कोणालाच न वगळता सगळ्यांना आपल्या जाळ्यामध्ये खेचले आहे आणि जर या सार्यामधून आपल्याला लवकरात लवकर बाहेर यायचे असेल तर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन कारण्याखेरीस अजून दुसरा काहीच पर्याय आपल्यासमोर शिल्लक नाही आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times