Breaking News
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहे. आज आणि उद्या दोन दिवसांत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार ही गुप्तता कायम आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल काही वेगळा निर्णय घेणार का, याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून आज (सोमवारी) निर्णय कळवणार असल्याचे सांगितल्याची माहिती या नेत्यांनी दिली. राज्यपाल सकारात्मक असल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले होते. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिला आहे. त्यांनी लवकर मंजूर द्यावी, यासाठी त्यांची भेट घेतली होती. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्याच जाहीर करावा, अशी विनंतीही त्यांना करण्यात आली आहे. ते हा कार्यक्रम मंजूर करतील अशी आम्हांला खात्री आहे, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले.
मंगळवारी अधिवेशनांचे शेवटचा दिवस आहे. आज विधिमंडळात राज्यातील कायदा सुव्यवस्था ह्यावर विरोधक आक्रमक होणार आहेत. आज सर्वांचे लक्ष लागले आहे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार का? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करून विधीमंडळाकडून पाठवतात का, याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. काल महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी राज्यपाल यांची भेट घेतली होती. आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. भाजपाचे बारा निलंबित आमदारकी मागे घेणे, त्याचवेळी अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणे, यासाठी महाविकास आघाडी नेते आणि भाजपा नेते यांच्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत, यात काय निष्कर्ष निघतो याकडेही लक्ष लागले आहे.
विधानसभेत आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार, महिला अत्याचार यावरुन सरकारला घेरतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे विधान परिषदेत अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक यावर लक्षवेधी आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्न, गुन्हेगारी, माजी मंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण प्रकरणात नाव यासह अनेक मुद्दे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर बोलणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times