Breaking News
परिस्थिती जेवढी तिखट मराठा तेवढाच तिखट असं म्हणत, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपटाचा टिझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा धगधगता टिझर तितक्याच दणक्यात आपल्यासमोर आला आहे.
चित्रपटात अभिनेता प्रविण तरडे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शना सोबतच चित्रपटाची कथा आणि पटकथेची धुरा सुद्धा सांभाळली आहे. या आधी चित्रपटामध्ये अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी सोशल मीडियामार्फत आपल्यासमोर आली होती. काल (17 डिसेंबर) प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या टीजरबद्दल माहिती दिली होती. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे. या टीजरला त्यांनी कॅप्शन दिले, 'परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट ..' सध्या हा टीजर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times