Breaking News
एकी कडे कोरोना नियमांचं पालन करता हळू हळू सारे उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुद्धा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. १५ डिसेंबर पासून पहिली ते सातवी चे वर्ग खुले झाले होते ज्यामध्ये सगळ्यात आधी नवी मुंबई मधील शाळा सुरु झाल्या होत्या. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
देशामध्ये कोरोनाचा कहर बघायला मिळत आहे आणि त्याच जोडीला ओमायक्रॉनची भीती सुद्धा सगळी कडे पसरत आहे.गेल्या २४ तासात कोरोनाचे नवीन ७,१४५ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार शर्तीचे प्रयत्न करत आहे. परंतु नेहमी प्रमाणे यावेळी सुद्धा यामध्ये अडचण आली आहे. १५ डिसेम्बर पासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु झाल्यानंतर, नवी मुंबई मधील शाळेत १६ लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. घणसोली मधील शेतकरी शिक्षण संस्था शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे शाळेतील लहान मुले आणि त्यांचे पालक सुद्धा घाबरले आहेत. महानगर पालिकेच्या आदेशानुसार शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. परंतु तूर्तास तरी शाळा पुन्हा सुरु करण्याचा विषय बाजूलाच ठेवावा लागेल एवढं मात्र नक्की
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times