कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

2000 लाभार्थ्यांना मिळणार पुनर्वसनात घर

आठ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन ; 1396 घरांसाठी लवकरच निविदा 

पनवेल : कोरोनामुळे दोन वर्षांपासून ठप्प झालेल्या पनवेलमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यात आली असून गत बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत 1396 घरांसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सुमारे 350 चौरस फुटांच्या घरांचे रखडलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रधानमंत्री आवास योजनेशी निगडित सर्व विभागांच्या अधिकार्‍यांशी संयुक्त बैठक घेतली. यामध्ये नेमकी प्रक्रिया कुठपर्यंत पार पडली याचा आढावा घेत पनवेलमधील पाच झोपडपट्टींच्या पुनर्वसनाला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये अजून तीन झोपडपट्ट्यांचा समावेश करीत एकूण आठ झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे नियोजन केले असल्याचे सांगितले. त्यामुळे 2000 लाभार्थ्यांना पुढील काळात पुनर्वसनात घर मिळणार आहे. पनवेल पालिकेची स्थापना झाल्यानंतर 2016 मध्ये झोपडपटट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार 60 विविध झोपडपट्टयांमध्ये साडेआठ हजारांहून अधिक लाभार्थी राहत असल्याचे समोर आले. जुन्या नगर परिषद क्षेत्रातील 26 झोपडपट्टयांमधील 4 हजार झोपडपट्टीवासीयांना घरे मिळावीत यासाठी पालिकेची प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे.  पालिका क्षेत्रात इतर झोपडपट्टी या सिडकोच्या जागेवर तर इतर गावठाणातील आदिवासी वाड्यातील घरे, रेल्वे व एमआयडीसी या वेगवेगळ्या प्राधिकरणांच्या जागेवर झोपड्या असल्याने त्या झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असणार आहे. त्यानुसार पूर्वाश्रमीच्या नगरपरिषद क्षेत्रातील लक्ष्मी वसाहत, वाल्मिकीनगर, महाकालीनगर, कच्चीमोहल्ला आणि पटेल मोहल्ला या पाच झोपडपट्ट्यांमध्ये 1396 लाभार्थी आहेत. यांचा विकास आराखडा शासनाला पनवेल पालिकेने पाठविला असून या झोपडपट्टयांचे पुनर्वसन पहिल्या टप्यात करण्याचे पालिकेने यापूर्वीच नियोजन केले आहे. बुधवारच्या बैठकीत आयुक्तांनी पनवेल बस आगाराच्या परिसरातील इंदीरानगर   झोपडपट्टीमधील 243, अशोकबाग झोपडपट्टीतील 206 तसेच खासगी जागेचा वाद असलेल्या शिवाजीनगर झोपडपट्टीवरील 367 लाभार्थींसाठी नवीन विकास आराखडा तातडीने बनविण्याचे आदेश दिले आहेत. दुसर्‍या टप्प्यात यासाठी केंद्र व राज्याकडून परवानगीसाठी पालिकेच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. 

450 कोटी रुपये खर्च
पालिका पहिल्या टप्प्यात बांधत असलेल्या गृहनिर्माणामध्ये प्रत्येकाला 29 चौरस मीटरचे म्हणजे 350 फुटांचे घर अल्प दरात मिळणार आहे. पुढील महिन्यापर्यंत 1396 घरांसाठी निविदा प्रक्रिया पार पडेल. पालिका, केंद्र व राज्याचे मिळून यासाठी 450 कोटी रुपये खर्च होणार आहेत. बाजारमूल्यांपेक्षा अत्यंत कमी दरात लाभार्थ्यांना घरे देण्याचा प्रयत्न असल्याचे बैठकीत आयुक्त देशमुख यांनी सांगितले. 
सिडको क्षेत्रातील पुनर्वसन रखडले
पनवेल महापालिका हद्दीत 60 विविध झोपडपट्टया असून त्यात साडेआठ हजारांहून अधिक कुटुंब राहत आहेत. यातील जुन्या नगर परिषद क्षेत्रातील 26 झोपडपट्टयांमधील 4 हजार झोपडपट्टीवासीयांना घरे मिळावीत यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र सिडको हद्दीत असलेल्या झोपडपट्टयांचे पुनर्वसनाचा पेच कायम आहे. सिडको पुढाकार घेत नसल्याने महापालिकेने सिडकोकडे भूखंडाची मागणी केली आहे. मात्र त्यासही सिडकोने नकार दिला आहे. त्यामुळे सिडको क्षेत्रातील सुमारे 11 झोपडपट्टींमधील रहिवाशांचे पुनर्वसन रखडले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट