Breaking News
आपल्यापैकी बरेच जण श्रावणात उपवास धरतात.अर्थात आपल्याकडचे उपवास हे बर्याचदा श्रद्धेपोटी किंवा शास्त्र म्हणून केले जातात. पण उपवासामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घेण्याच प्रयत्न कोणीही करत नाही.असो, या लेखातून आपण उपवास आणि त्याचे फायदे तोटे याबद्दल विश्लेषण करून त्यामागचे विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
श्रावणात उपवास करावे का ?
उपवास करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही, बदलत्या ऋतूनुसार आहार बदलणे आवश्यक असते. पावसाळ्यात वातावरणात आद्रता असल्याने आपली पचनशक्ती कमकुवत होते आणि जीवणूजन्य रोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शकतो या काळात पचायला हलका आणि व्यवस्थित शिजवलेला आणि मध्यम आहार घेणे फायद्याचे असते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पावसाळा पूर्ण चार महिने असतो तर मग उपवास श्रावणातचं का करतात? पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीतील बहुतेक सण श्रावणानंतर सुरू होतात. सणादरम्यान बहुतेक घरांमध्ये गोड, कर्बोदके युक्त (कार्बोहायड्रेट्स), तूप अथवा तेलात तळलेले, उच्च उष्मांकयुक्त (उच्च कॅलरी) पदार्थ बनवले जातात. सणांदरम्यान भावनिक आहार सेवन या मानसिक प्रकृतीमुळे कळत नकळत गरजेपेक्षा जास्त उच्च उष्मांकयुक्त पदार्थ सेवन केले जातात आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे श्रावण महिन्यात आहारावर आणि उच्च उष्मांक पदार्थ सेवनावर थोडा संयम ठेवल्यास आयोग्याचा सुवर्णमध्य राखला जातो. परंतु बर्याचदा श्रावणानंतर आहार पद्धतीत मोठे बदल होत असल्याने, श्रावणातील उपवासाचा तितकासा फायदा शरीराला होत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला गेल्यास काही दिवस उपवास करून नंतर पुरेमाप खाण्यापेक्षा, संपूर्ण वर्षभर योग्य, मोजके आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे जास्त परिणामकारक आहे.
उपवास केल्याचे फायदे
उपवास केल्याचे तोटे
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, अगदी त्याचप्रमाणे उपवास केल्याचे काही तोटे देखील आहेत. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) नुसार, अधूनमधून उपवास करण्याशी संबंधित असंख्य आरोग्य धोके आहेत.उपवासदरम्यान एखाद्यास डिहायड्रेशन होऊ शकते, कारण त्यांच्या शरीराला अन्नातून द्रव मिळत नाही.त्यामुळे उपवास करणार्या व्यक्तींनी उपवासाच्या काळात योग्यरित्या पाणी अथवा सरबताचे सेवन करावे. जर तुम्हाला वेळेत आणि पुरेसे खाण्याची सवय सवय असेल तर उपवास कालावधी हे एक मोठे आव्हान असू शकते. अशाप्रकारे, उपवास केल्याने तुमची तणाव पातळी वाढवू शकते आणि झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. डिहायड्रेशन, उपासमार किंवा उपवासाच्या काळात झोपेची कमतरता किंवा डोकेदुखी देखील होऊ शकते. उपवासामुळे छातीत जळजळही होऊ शकते. शक्यतो, अन्नाअभावी पोटातील आम्ल कमी होते, जे अन्न पचवते आणि जीवाणू नष्ट करते. परंतु उपवासाच्या काळात अन्नाचा वास घेणे किंवा त्याबद्दल विचार करणे हे मेंदूला पोटात अधिक आम्ल निर्माण करण्यास सांगण्यास उत्तेजन देऊ शकते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.त्यामुळे उपवास करताना वरील सर्व बाबींचा, तसेच शारीरिक समस्यांचा विचार करणे देखील गरजेचे आहे.-आहारातज्ञ कानन घरत , आहार सल्लागार दिनराज आपोणकर (Healthy by food)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times