Breaking News
पावसाळा सुरू झाला की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदल करतो. उन्हाळ्यामध्ये ज्याप्रकारे थंड पदार्थ खाल्ले जातात. त्याच प्रकारे पावसाळ्यामध्ये गारठा वाढत असल्यामुळे शरीराला उष्णता देणार्या पदार्थांचा समावेश केला जातो.
त्याबरोबरच उन्हामध्ये खाल्ले जाणारे ते थंड पदार्थ पावसाळ्यात आहारातून बाद होतात. उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळावा म्हणून दररोज खाल्लं जाणारं दही किंवा ताक पावसाळ्यात मात्र खावं की नाही अशी शंका मनात यायला लागते. दही हे थंड प्रकृतीचं असल्यामुळे पावसाळ्यात दही खाल्ल्यास त्याचे साइड इफेक्ट होऊन सर्दी, खोकला, ताप असे त्रास होण्याची भीती मनामध्ये असते. ज्यांना दररोज दही खायला आवडतं. त्यांना मात्र पावसाळ्यात अडचण होते.
पावसाळ्यात आहाराकडे जास्त लक्ष द्या असं आयुर्वेद सांगतो. तर आयुर्वेदानुसारच पावसाळ्यामध्ये दही खाऊ नये असंही सांगितलं गेलं आहे. कारण यामुळे वात आणि पित्त संचय वाढतो आणि आरोग्य संबंधी त्रास सुरू होतात. मात्र, डॉक्टारांच्यामते दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असल्याने पावसाळ्यात सुद्धा दही खाणं आवश्यक आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times