Breaking News
18 फेब्रुवारीला होणार उद्घाटन
पनवेल : पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अखेर 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा सुशोभीकरणाचे उदघाटन केले जाणार आहे. शिवजयंतीच्या आधी या सुशोभिकरणाचे उद्धाटन होत असल्याने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची विशेष ओळख आहे. या रायगडाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली होती. या संदर्भात त्यानी सातत्त्याने पाठपुरावा केला. येथे मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. याठिकाणी एकुण 22 शिल्प उभारण्यात आले आहेत. हे काम पूर्ण झालेले आहे. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभिकरणाचे उदघाटन 18 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाचे सुशोभीकरण पूर्ण झाल्याने शिवप्रेमींनी विशेष आनंद व्यक्त केला आहे. याकरिता अंदाजे पावणे दोन कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या परिसराचे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. 528 चौरस मीटर या जागेत 100 मीटर चौथरा बांधण्यात आला आहे.
कित्येक वर्षांपासून हे सुशोभीकरण रखडले होते. सभागृहात विषय मांडून वारंवार पाठपुरावा करुन तो मंजूर करण्यात आला. सुशोभीकरणामुळे पनवेलची शान वाढली आहे. याचे उदघाटन होत असल्याने आनंद होत आहे. - विरोधी पक्षनेते, प्रीतम म्हात्रे, पनवेल महापालिका
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times