Breaking News
तणाव मुक्ती आणि योगाभ्यास याविषयीचा पहिला भाग मागिल अंकात आपण प्रदर्शित केला. आता याविषयी आणखी सविस्तर माहिती या भागात घेऊ.
मानसिक साधना ही योगसाधनेची फार महत्वाची मानली जाते. योग साधनेचे ध्येय म्हणेज समाधी. पण आपणासारख्या सामान्य माणसांना समाधीचा विचार मनात आणणे कठिण आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा संसारामध्ये गुंतुन गेलेला आहे. हकाहीजण व्यावसायामध्ये मशगुल आहेत. त्यांना समाधिपर्यंत योग साधना करणे अरघड आहें. आरोग्य राखण्यासाठी धारणा, ध्यान, करणे अतिशय जरुरीचे आहे.
आपण आता मनस्वास्थासाठी करावयाचे योग प्रकार पाहू.
दिर्घश्वास
कोणत्याही बैठक स्थितीमध्ये बसावे. पाठ नैसर्गिक स्थितीमध्ये ठेवावी. दोनही हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये द्रोणासारखी स्थितीमध्ये ठेवावेत. तळवा गुडघ्यात असावा. चेहर्याचे स्नायू शिथील ठेवावेत. दोनही हात शिथील असावेत. पोटाचे स्नायू शिथील असावेत. श्वासप्रश्वास नैसर्गिक ठेवावा. आता हळुवारपणे श्वास नाकावाटे आत घ्यावा बाहेर सोडावा. असे दोन तीन वेळेस करावा नंतर पुर्णपणे दिर्घ श्वास आतमध्ये घ्यावा. छातीचे स्नायू पुर्णपणे प्रसरण पावतील आणि हळूवापरपणे श्वास बाहेर सोडावा. सदर क्रिया अतिशय शिस्तबद्ध करावी. मनाला संपुर्णपणे श्वासावर केंद्रित करावे. ही साधना सुरुवातीला दोन तीन मिनीटे करावी. नंतर हळूहळू वाढवत आपल्या क्षमतेनुसार पाच ते दहा मिनिटेपर्यंत करावी. साधना संपल्यावर डोळे मिटून ध्यानस्थ बसावे. थोडावेळानंतर हळूहळू डोळे उघडावे आणि आरामदायी स्थितीमध्ये जावे. या पद्दतीने सकाळी व रात्री झोपण्या आधी दोन तीन आवर्तने करावीत.
पोटाचे गंभीर आजार आहेत त्यांनी हा अभ्यास योग्य तर्हेने अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. शक्यतो अनोषापोटी हा अभ्यास करावा. जेवल्यावर किंवा नाष्टा केल्यावर करु नये
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times